Thursday, September 1, 2011

पीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...

literature surve करत रात्रभर जागते
experiment design कर करून थकते
रिझल्ट तरी मला मिळतच नाही
पीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...
                   केलेल्या १० experiment मध्ये १ experiment चुकतो
                   त्या चुकीसाठी सारा plan repeat होतो
                   सरांना
हार्डवर्कच कौतुक नाही
                   पीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...
मिळालेला
रिझल्ट बॉसला exciting वाटत नाही
exciting रिझल्टचा पेपर accept होत नाही
पीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...
             
       क्षणोक्षणीच्या परीक्षेनी माझा अर्जुन झाला
                   माझ्या हिश्याचा कृष्ण पाठवायला बाप्पाच विसरला
                   कोणी मला समजून घेतंच नाही
                   पीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...



- पद्मश्री पाटी

पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....

बाबांच्या हाताला धरून शाळेत जायचंय,
म्हणाले बाबा जरी पहिल्या ओळीत बस,
ओळीत शेवटी बसून दुपारी
पेंगायचंय ...
पुन्हा एकदा
मला शाळेत जायचंय....

                   सर्वांच्या बरोबर वनभोजन करायचय,
                   चिंचा, आवळे खात
कापसाच्या म्हातारीला पकडायचंय,
                   aquaguard सोडून टाकीच पाणी प्यायचय  ...
                   पुन्हा एकदा 
मला शाळेत जायचंय...  

आईने दिलेला डब्बा सोडून मित्राचा डब्बा खायचाय,
सुदाम्याचे पोहे रुचकर म्हणत स्वतःला कृष्ण
मानायचंय,
चाराण्याचा बर्फ गोळ्यांनी ओठांना रंगवायचं..
पुन्हा एकदा
मला शाळेत जायचंय...
               
                 लहानपणीच्या प्रश्नाला मला आता उत्तर द्यायचाय
                 मोठेपणी होणार कोण ?
                एकदा पुन्हा लहान
व्हायचंय...
                पुन्हा एकदा
मला शाळेत जायचंय...

- पद्मश्री  पाटील  ..


Saturday, August 27, 2011

वपुर्झा...

व. पु. एक ध्यास ...
वपुर्झा एक हव्यास... पुन्हा पुन्हा वाचण्याचा, ऐकण्याचा ....
मला जे पटलं आणि आवडलं ते गोळा करून जोडण्याचा एक छोटा प्रयत्न, माझ्या प्रिय मैत्रिणीसाठी....


पशु माणसापेक्षा श्रेष्ट असतात, कारण ते instinct वर जगतात.
बेदम वजन वाढलाय म्हणून घारीला उडता येत नाही किंवा एखांदा मासा
बुडालाय
असं कधी ऐकलंय का?

"आठवणी ह्या मुंग्यांच्या वारूला सारख्या असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही,पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला कि एका मोगोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात .
आठवणींच हि तसच आहे."
 
 
पाऊसात भटकत असताना अंगावरचा शर्ट भिजतो  तेंव्हा  काही वाटत नाही, तो अंगावरच हळू हळू सुकतो  तेंव्हा त्याचही काही वाटत नाही,सुकला नाही तरी ओल्याची सवय होते; पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हणल तर कसं वाटतं?  

 Identity card सारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात   नाही , आपण आहोत कसे ? हे त्यांना हवं असत पण त्याऐवजी आपण दिसतो कसे हे पाहून ते आपणाला ओळखतात.  

वेळ पुरत नसला कि तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो; मध्ये लुडबुड करत नाही. आपण त्याचा वापरतो पण तो स्वतःच असतीत्वाही प्रकट करत नाही. पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्या सारखा वेरी नाही, तो तुम्हाला उधवस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात .

      

Saturday, July 30, 2011

"गंध"


पहिला पाऊस, देवपूजा, मोगऱ्याचा वेल, स्वयंपाक बनविण साऱ्यांशी मी एकामुळे जोडलेले आहे, तो आहे फक्त "गंध". या सर्वांमध्ये माझा एक स्वार्थ आहे. देवरयातल्या देवाच्या अशीर्वादापेक्षाही, पाण्याच्या गरजेपाक्षाही, आणि पोठ भरण्याच्या लालचेपेक्षाही मला त्यांच्या सहवासात खूप आनंद मिळतो, आणि बऱ्याच जणांना कदाचित माझ्याच सारखे वेड असेल.
            "गंध "
त्याच्या मनातील गुपित उधळत येतो...
उगाच मला धुंद करतो,
होठावरती हास्य ठेवून जातो, 
आठवणीची कुपी उघडी करतो....
          किती रुपात भोऊन जातो 
          पहिला पाऊस, नवीन पुस्तक, रात्री उमलेला प्राजक्त-मोगरा...   
          कोंडलेल्या वाऱ्याच्या सुटकेसारख्या धुंद होऊन पसरतो,
          स्वार्थ परमार्थ त्याला काय ठाऊक, प्रिय-जनान्सारख्या एकरूप होतो....

Saturday, July 16, 2011

लग्नं...


 
लग्नं...
    एक सुंदर स्वप्न जे प्रत्येक तरुण आपल्या मनात कोरतो ....
    आपला  जोडीदार  कसा असावा, या विषयी कल्पना नसलेला आज पर्यंत मी पाहिलेला / पाहिलेली नाही...
हा विषय आज एवढ्यासाठी आला कारण परवाच माझ्या बहिणीच्या लग्नाला  गेले होते. सगळ्याच आनंदी  वातावरणात मी मात्रं जरा विचारात होते; जी मुलगी M .Sc. झाल्यानंतर सुद्धा हुंडा किंवा वरदक्षिणा या नावाखाली लाखोन रुपये खर्च करावे लागले. मग या सगळ्या शिक्षणाचा आणि प्रगत विचार असण्याचा काय उपयोग होता/ आहे ?
     मुलगी कितीही सुंदर/ अनुरूप  असली किंवा कितीही उच्च शिक्षित असली तरीही तिला या वरदक्षिणा तून काही सूट मिळत नाही, आणखी कशी मिळेल या सर्वाना एक बाजूनी मुलीचे  पालक हि जबाबदार असतात. सर्व आई- बाबांना आपली मुलगी सुखात ठेवण्यासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला "लाच" हि द्यावीच लागते !!!
     आयुष्याची  सुंदर सुरवात करताना किती लोक हा विचार करतात कि त्याचे / तिचे विचार जुळतात. बाह्य  सुंदरते पेक्षा किती लोग एकमेकाला समजून घेण्याची पातळी बघतात?  किती लोग हा विचार करतात मला ठाऊक नाही , पण बहुतांशी लोक मला सुंदरता, वरदक्षिणा या मध्ये  इंटरेस्टेड वाटतात.अजून एक गोष्ट, सर्वच मुलांना आपली होणारी नववधू हि सुंदर हवी, वेल studied   हवी , आणि मेन गोष्ट ती वेल cultured हवी. आता या well ( वेल)  या लेबलखाली त्यांची काय  अपेक्षा असते हे अगदीच सांगण अवघड आहे.
      आजकाल या so called प्रगत जगात modernization च्या नावाखाली आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण सर्व बाबतीत करतो पण महत्वाचं विचारांचं modernization हुंड्यामध्ये  विसरून जातो (चुकून modernizationने  त्या हुंड्या मध्ये फ्रीज, टीव्ही, मिक्रोवेव, वाशिंग मशीन.... add केले आहे).    
या हुंड्या/ मानपाना पायी मग बरंच रामायण महाभारत घडतं. अगदीच मुलीला कायमचं माहेरी पाठवण्या पासून ते तिला जीवे मारण्या पर्यंत...  
तिची स्वप्नं....            
करीन सखे मी संसार,
आवडते माझ घर दार,
प्रसन्न पतीराज करुनी,
बनेन खाशी शुभ रजनी...   
तिच्या आशा...डाव मोडून पडतो ..... ना स्वप्नातली राजा अन राणी.....

Friday, April 29, 2011

"बंध प्रीतीचे"

मला नव्हतं  माहीत ,
तुझ्या बोलण्याच मोहितं,
एकदा ऐकलं कि  पाहण्याचा  मोह,
आणि पाहिल्यानंतर सदेइव  सोबत राहण्याचा....
वाटे कधी माझी मलाच भीती ,
माझी मी न राहण्याची...
जडता जडले हे नाते ,
एक कोडे न उलगडलेले, 
पण सोडविण्याची हि भीती जिथे....
कोडे हे तुझे माझे "बंध प्रीतीचे".


- पद्मश्री पाटील 



Saturday, February 19, 2011

मैत्री..

आज मी पहिला पोस्ट लिहित आहे , विचार केला कि काय लिहावं ?.. आणि पुढच्याच  क्षणी लिहीलं गेलं " मैत्री".  माझा हा पहिला पोस्ट अश्याच एका मित्रासाठी ज्यांनी मला ब्लोग लिहायला शिकवला.
           "मैत्री" आणि "मोगरा " या दोन गोष्टी ज्या मला खूप आवडतात, 
           ज्यांच्या भोवतालीच्या जाणिवेन जगाचा विसर होतो ... 
           आणि अर्थात तो क्षण जगल्याचा आनंद ...

मी एक गोष्ट  ऐकली होती,जी खूप सुंदर आहे.,
      एकदा काय होत कि, एक मनुष्य  आपला भूतकाळाचा प्रवास कसा झाला आपल्या बरोबर कोणी कोणी साथ दिली हे पाहायचं ठरवतो, देव त्याला एक वर देतो कि," तुला तुझा भूतकाळाचा प्रवास तुला तुझ्या पायांच्या ढस्याच्या स्वरुपात दिसेल". त्याला दिसत कि त्याच्या पायांच्या  बरोबर नाहामी दो पाऊले आहेत. तो देवाला विचारतो कि माझ्या पायाच्या ठस्यांच्या  बरोबर हे दोन पायेंचे ठसे कोणाचे आहेत? देव सांगतो "ते दोन पायांचे ठसे माझे आहेत". हे ऐकताच त्याला खूप आनंद होतो, नेहमी साथ दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो, थोड्या वेळानं त्याला लक्षात येत कि, काही ठिकाणी फक्त दोनच पाऊले आहेत, ते क्षण तर दुःखाचे, अडचणीचे  आहेत. मनुष्याला खूप वाईट वाटत कि दुःखाच्या प्रसंगी देवाने अपनाल साथ दिली नाही, तो परत देवाला विचारतो, "तू मला अडचणीच्या वेळेला का एकटे  सोडून दिलेस ?" देव म्हणतो, " अरे ते दोन पायांचे ठसे माझे आहेत त्या वेळी तर मी तुला माझ्या खांद्यावर घेतलं  होतं! "
          आजच्या या युगातल्या मनुष्याची गोष्ट जरा वेगळी आहे, १९९९ मध्ये जगाची लोकसंख्या हि एक बिल्लीओन (1000000000) होती .  देवाकडे एवढाही वेळ नसेल कि तो सर्वांसोबत राहील म्हणून त्याने एक नातं  प्रत्येकाला दिल, ते नातं  आहे "मैत्रीच". "मैत्री " आपल्या बरोबर गोष्टीतल्या देवासारखी सोबत देणारी आणि प्रसंगी आपल्याला खांद्यावर घेणारी!...