Friday, January 13, 2012

अन जगण्यावर जीव जडावा ...

असंख्य स्वप्नातील एक स्वप्नं,
त्या स्वप्नाचा साकार व्हावा,
अन जगण्यावर जीव जडावा ...

ओठातील वेदनेचा बांध तुटावा, 
हृदयातल्या हास्याचा मग एक तुषार व्हावा,
अन जगण्यावर जीव जडावा ...

रात्रीनं रात्री गेल्या पहाटही सुन्या सुन्या,
त्या पहाटेच्या स्वप्नातही तुझ्या मिठीचा गंध यावा,
अन जगण्यावर जीव जडावा ...


जगले मी कालही, आजही जगतेच आहे,
त्याच त्या जगण्याला मला नवा अर्थ मिळावा,
अन जगण्यावर जीव जडावा ...  


 - पद्मश्री पाटील 

*inspired from "प्राजू's ब्लॉग