Showing posts with label shala. Show all posts
Showing posts with label shala. Show all posts

Thursday, September 1, 2011

पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....

बाबांच्या हाताला धरून शाळेत जायचंय,
म्हणाले बाबा जरी पहिल्या ओळीत बस,
ओळीत शेवटी बसून दुपारी
पेंगायचंय ...
पुन्हा एकदा
मला शाळेत जायचंय....

                   सर्वांच्या बरोबर वनभोजन करायचय,
                   चिंचा, आवळे खात
कापसाच्या म्हातारीला पकडायचंय,
                   aquaguard सोडून टाकीच पाणी प्यायचय  ...
                   पुन्हा एकदा 
मला शाळेत जायचंय...  

आईने दिलेला डब्बा सोडून मित्राचा डब्बा खायचाय,
सुदाम्याचे पोहे रुचकर म्हणत स्वतःला कृष्ण
मानायचंय,
चाराण्याचा बर्फ गोळ्यांनी ओठांना रंगवायचं..
पुन्हा एकदा
मला शाळेत जायचंय...
               
                 लहानपणीच्या प्रश्नाला मला आता उत्तर द्यायचाय
                 मोठेपणी होणार कोण ?
                एकदा पुन्हा लहान
व्हायचंय...
                पुन्हा एकदा
मला शाळेत जायचंय...

- पद्मश्री  पाटील  ..